पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!!!              “या” ग्रामपंचायतचे सरपंच नेमके कोण?सरपंचांना अंधारात ठेवून केले ध्वजारोहण ;गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!!! “या” ग्रामपंचायतचे सरपंच नेमके कोण?सरपंचांना अंधारात ठेवून केले ध्वजारोहण ;गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

पुणे

शिरुर तालुक्यातील महाळुंगी – पारोडी गृप ग्रामपंचायत मध्ये अजब प्रकार घडला असुन सरपंच यांची वाट न पाहता वेळे आधिच भलत्यानेच झेंडावंदन केले त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले.


शिरूर तालुक्यातील पारोडी ग्रामपंचायतीत ठरविण्यात आलेल्या वेळेच्या आधीच ध्वजारोहण करण्यात आल्याने या प्रकरणी सरपंच कमल प्रकाश शिवले यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.


ग्रामपंचाय पारोडी येथील ग्रामपंचायतीचे नमूद वेळेपूर्वी १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या नियोजनाप्रमाणे सकाळी ८ वा. १५ मिनिटांनी ध्वजारोहण करण्याचे ठरले होते. मात्र हे ध्वजारोहण ठरलेल्या वेळे आधीच ७ वा ५५ मिनिटांनी ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात आले आहे.


15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने झेंडावंदन करण्यासाठी झालेल्या बैठकीत वेळ ठरवली असतानाही गावातीलच बापु धबन येळे हे चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर कार्यरत असून त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून आपल्या पदाचा गैरवापर करत विद्यमान सरपंच यांची वाट न पाहता ठरलेल्या वेळे आधिच शिक्षक व ग्रामस्थांचे आदेश झुगारून झेंडावंदन केले.


हा ध्वजारोहण कार्यक्रम ठरलेल्या वेळेपूर्वी कसा काय झाला याची खातर जमा करावी आणि या प्रकारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच कमल शिवले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *