पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!!  “या” गावात लग्नाचे आमिष दाखवून विधवा भावजयीवर बलात्कार

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!! “या” गावात लग्नाचे आमिष दाखवून विधवा भावजयीवर बलात्कार

पुणे

आराेपी दिराला हडपसर पाेलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पीडित ३३ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेच्या नवऱ्याचे निधन झाले आहे. पीडित महिलेला दाेन मुली आहेत. ती मुलींसह माहेरी राहत होती.  दरम्यान, दिराने तुझी आणि मुलींची काळजी घेईन,असे सांगून फेब्रुवारी २०२१ मध्ये तिला पुण्यात बोलावून घेतले.

यानंतर आरोपीने पीडितेवर बळजबरी केली आणि कोणाला काही सांगितलं तर जीवे मारेल अशी पीडितेला धमकी दिली. लग्नाचे आमिष दाखवून आरोपी पीडित महिलेसोबत गैरवतर्न करत होता.

दरम्यान, फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे की, लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने वाद घातला आणि लग्नास नकार देत पीडितेला तिच्या मुलींसह घरातून हाकलून दिले.

पीडित महिलेच्या तक्रारी नंतर दिराला हडपसर पाेलिसांनी अटक केली आहे. सहायक निरीक्षक थाेरबाेले या प्रकरणाचा पूढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *