पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार !!!!!                     “या” गावात पार्सल घेवून आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीबरोबर केला विचित्र प्रकार

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार !!!!! “या” गावात पार्सल घेवून आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीबरोबर केला विचित्र प्रकार

पुणे

पुण्यात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे.जेवणाचे पार्सल घेवून आलेल्या डिलिव्हरी बॉयने एका तरूणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या तरुणाने १९ वर्षीय तरुणीचं चुंबन घेतल्याची घटना येवलेवाडी परिसरातील एका सोसायटीत शनिवारी रात्री घडली.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.रईस शेख (४०) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी येवलेवाडी परिसरातील एका सोसायटीत राहते. शनिवारी रात्री पीडित तरुणीने एका अॅपवर ऑनलाईन ऑर्डर मागवली होती.

त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी रईस शेख पार्सल घेवून आला.जेवणाचे पार्सल दिल्यानंतर आरोपी शेखने पीडित मुलीकडं पिण्याचे पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर आभार व्यक्त करणाच्या बहाण्याने शेखने पीडितेला चुंबन घेत हात पकडून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी शेखला बेड्या ठोकल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *