पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!!                “या” गावातील तरुण जंगली रम्मी गेममध्‍ये वीस हजार रूपये हरला;घरचे रागावतील या भितीने घेतला गळफास

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!! “या” गावातील तरुण जंगली रम्मी गेममध्‍ये वीस हजार रूपये हरला;घरचे रागावतील या भितीने घेतला गळफास

पुणे

ऑनलाईन गेमिंगमधून पैसा मिळविण्याच्या मोहात अनेक तरुणांचे नुकसान होत आहे. यातूनच एका तरुणाने आत्महत्या केली. मावळच्या तळेगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

गणेश काळदंते असं त्याचं नाव होतं. मावळच्‍या तळेगावात वास्‍तव्‍यास असलेला गणेश काळदंते यास मोबाईलवरील जंगली रमी खेळायची सवय लागली होती. या ऑनलाईन रमीमध्ये तो वीस हजार रुपये हरला.

गणेश हा कार चालक असून त्याला व्यसनही होते. त्यातच तो मोबाईलवर रमी खेळत असे. कमावलेले बहुतांश पैसे तो यातच उडवत असायचा. कुटूंबियांनी त्‍याला अनेकदा यापासून दूर ठेवायचा प्रयत्‍न देखील केला. परंतु, सवय लागल्‍याने तो सतत ऑनलाइन गेम खेळत होता.

विवाहित असलेला गणेश असा वाया गेल्याचं दिसून यायचं त्यामुळं कुटुंबीय त्याच्यावर अनेकदा ओरडायचे. अशातच तो रमी मध्ये वीस हजार रुपये हरला. यामुळे आता तर घरचे चांगलेच भडकणार. याच टेन्शनमध्ये त्याने रविवारच्या सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केली. अशी माहिती कुटुंबीयांनी तळेगाव पोलिसांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *