पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!!!               माझ्या घरी कधीपर्यंत राहणार,निघून जा असे म्हणत जावयाने सासुला सुनावून केली मारहाण;मेव्हणीवर चाकूने वार

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!!! माझ्या घरी कधीपर्यंत राहणार,निघून जा असे म्हणत जावयाने सासुला सुनावून केली मारहाण;मेव्हणीवर चाकूने वार

पुणे

मुलीच्या सासरी राहणाऱ्या सासुला जावई म्हणाला, तू माझ्या घरी कधीपर्यंत राहणार आहे. तू माझ्या घरातून निघून जा, असे म्हणून तिला हाताने मारहाण केली.तेव्हा मध्ये आलेल्या मेव्हणीवर चाकूने वार करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत पुष्पा वामन शेलार (वय ६५, रा़.वाघोली, केसनंद रोड, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांचा जावई रोशन डेव्हिड मंडलिक (वय ३९, रा. वाघोली केसनंद रोड, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची लहान मुलगी वैशाली हिच्या घरी त्या रहात असताना त्यांचा लहान जावई रोशन हा घरी आला. आपल्या सासुला तो म्हणाला, तू माझ्या घरी कधीपर्यंत राहणार आहे. तू माझ्या घरातून निघून जा, असे म्हणून त्याने सासुला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तेव्हा फिर्यादी यांची मोठी मुलगी दिपाली ही त्यांचे भांडण सोडविण्यासाठी आली.

तेव्हा रोशन याने तिला शिवीगाळ करुन तू मध्ये कशाला आलीस असे म्हणून बाजूला घरात जमिनीवर पडलेला भाजी कापण्याचा चाकू घेऊन मुलीच्या डावे हाताच्या दंडावर मारुन तिला जखमी केले.

फिर्यादी या त्याच्या हातातून चाकू काढून घेत असताना फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली. हा प्रकार ५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला. त्याची आता तक्रार देण्यात आली आहे. पोलीस अंमलदार बांगर तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *