पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!!              माझ्या गाडीला धक्का लागतोय अस म्हणणार्‍या तरुणास “या” गावात दगडाने ठेचून मारले

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!!!! माझ्या गाडीला धक्का लागतोय अस म्हणणार्‍या तरुणास “या” गावात दगडाने ठेचून मारले

पुणे

शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गुन्हेगारी काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. हडपसर परिसरात फक्त कारचा धक्का लागला म्हणून एका ३० वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

१० जणांच्या टोळक्याने कारचालकावर धारदार शस्त्राने वार करत, तसंच दगडाने ठेचून ठार केलं. शेवाळवाडी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

अभिषेक संजय भोसले (वय ३०, रा. शेवाळवाडी, मांजरी) असं खून झालेल्या कारचालकाचं नाव आहे. याप्रकरणी विलास सुरेश सकट, कैलास सुरेश सकट, सचिन सकट (सर्व रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांच्यासह आणखी ७ ते ८ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अभिषेक याचा भाचा अथर्व दादासाहेब साबळे (वय १८, रा. ऑर्चिड रेसिडन्सी, शेवाळवाडी, मांजरी) याने फिर्याद दिली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *