पुणे
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. कोरेगाव भीमाचे सरपंच यांची फॉर्च्युनर वाहनाची चोरीची घटना उघडकीस आली आहे.हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पहाटेच्या सुमारास ही चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
चोरीची धक्कादायक घटना कोरेगाव भीमा परिसरातून उघडकीस आली. संदीप ढेरंगे असे माजी सरपंचाचे नाव आहे. ते कोरेगाव भीमाचे सरपंच होते. ढेरंगे सरपंच यांच्याकडे फॉर्च्युनर कार होती. मात्र, आज सकाळी पहाटेच्या सुमारास त्यांची कार चोरीला गेली. यशराज टॉवर परिसरात, कोरेगाव भीमा-पुणे नगर रोडवर, चोरट्यांनी फॉर्च्युनर वाहनावर डल्ला मारला. तसेच वाहन चोरी करून चोर पुण्याच्या दिशेनं पसार झाले.
चोरट्यांनी फॉर्च्युनर वाहन चोरी करण्यासाठी आणखी एका वाहनाचा वापर केला होता, अशी प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. ढेरंगे सरपंच यांना फॉर्च्युनर वाहन चोरीला गेल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तसेच फॉर्च्युनर वाहन चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली.पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात चोरट्यांनी फॉर्च्युनर वाहन चोरी केली असल्याचं निर्दशनास आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर कोरेगाव भीमा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.