पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणचे अधिकारीच करतात ग्राहकांची लूट? काय आहे नेमक प्रकरणं??????

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार!देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणचे अधिकारीच करतात ग्राहकांची लूट? काय आहे नेमक प्रकरणं??????

पुणे

• महावितरणचे काही अधिकारी देखभाल-दुरुस्ती यंत्रणेच्या नावाखाली समांतर आर्थिक उत्पन्नाचे मार्ग काढत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.

• हे अधिकारी देखभाल दुरुस्तीसाठी यंत्रणेचा वापर करून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे उकळतात.

• परिणामी एकीकडे ग्राहकांची लूट तर दुसरीकडे महावितरणलाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे

• केडगाव कार्यकारी अभियंता कार्यालयांतर्गत काही दुय्यम अभियंते व उपविभागीय अधिकारी असे प्रकार करत असल्याचा आरोप होत आहे.

• त्यांनी देखभाल दुरुस्तीसाठी स्वत:चीच खासगी यंत्रणा उभी केली आहे.

• गावोगावी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अधिकृत पथक न पाठवत या खासगी यंत्रणेला पाठवत असल्याचे उघड झाले आहे.

• या सेवेसाठी ग्राहकांकडून 500 ते 1500 रुपये आकारले जात असल्याचेही आरोप आहेत

• हे अधिकारी महावितरणच्या अधिकृत ठेकेदारांना काम न देता आपल्याच यंत्रणेच्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे घेऊन दुरुस्ती करीत आहेत.

• या प्रकाराला ग्राहक संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.

न्यायाची प्रतिक्षा

• सरकारकडून पगार, भत्ते घेणारे अधिकारीच अशा पद्धतीनेच सामान्य शेतकरी व घरगुती ग्राहकांची लूट करीत असतील, तर लोकांनी न्याय कुठे शोधायचा?

शेतकरी संघटनेची मागणी

• त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.

• तसेच ग्राहकांना तातडीने सेवा मिळण्यासाठी अधिकृत दुरुस्ती पथक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे दीपक पवार यांनी केली आहे

महावितरणची प्रतिक्रिया

• याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता विकास आल्हाट म्हणाले, अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत.

• जर कुठे असे घडत असेल, तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *