पुणे
चाकण परिसरात वेगवेगळ्या घटनात गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जण दुपारच्या सुमारास बुडाले. यामध्ये वाकी खुर्द येथील भामा नदीत दोन जण बुडाले .
बिरदवडी ता. खेड येथील विहिरीत एक जण बुडाला.शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत एक जण बुडाला. अशा वेगवेगळ्या घटनात चार जण बुडालेले आहेत .
वाकी खुर्द येथे भामा नदीत एक वीस वर्षाचा कोयाळीचा विद्यार्थी तसेच १९वर्षाचा उत्तर प्रदेशातील तरुण आहे. शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत ४५ वर्षाचा पुरुष बुडालेला आहे. बिरदवडी येथील विहिरीतही एक तरुण बुडालेला आहे.
भामा नदीतील बुडालेल्या तरुणांना रेस्क्यू पथकाने शोध मोहीम घेऊन काढण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका तरुणाचा मृतदेह मिळाला आहे. या सर्व घटना दुपारी बारा ते साडेतीनच्या दरम्यान घडल्या. अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली.