पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!!! “या” बाजारात माझ्याकडे आलेले गिऱ्हाईक पळवितो,तुला आता मारूनच टाकतो,तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देत केले सपासप वार

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!!! “या” बाजारात माझ्याकडे आलेले गिऱ्हाईक पळवितो,तुला आता मारूनच टाकतो,तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देत केले सपासप वार

पुणे

कोणाची भांडण कशावरून होतील आणि कोण कशावरून कुणाचा जीव घेईल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना पुण्याच्या राजगुरूनगर शहरातून समोर आली आहे. माझे माशाचे गिऱ्हाईक पळवतो म्हणत रागातून दोघांनी शेजारी असणाऱ्या मासे विक्रेत्यांवर मासे कापायच्या कोयत्याने सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.http://aapulkivivahsanstha.com

याप्रकरणी दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तुला मारूनच टाकतो, तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत त्या मासे विक्रेत्यांवर वार केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.http://aapulkivivahsanstha.com

ही घटना राजगुरूनगर येथील मच्छी बाजारात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.आमन मोमीन आणि सुफियान मोमीन उर्फ दुध्या (रा. शिंपीआळी, राजगुरूनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. सोयल रफिक मोमीन हा यात गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खेड पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, राजगुरूनगर येथील मच्छी बाजारात हे दोघे मासे विकणारे मासे विक्री करतात.http://aapulkivivahsanstha.com

दोघांचेही शेजारी शेजारी मासे विक्रीचे दुकान आहे. दुकानवरचे ग्राहक त्याच्याकडे गेल्यावर ग्राहकाला फूस लावतो, तसेच कमी दराने मासे विक्री करून आमचे ग्राहक पळवतो, असा संशय दुसऱ्या विक्रेत्याला निर्माण झाला.याच वादातून आमन आणि सुफियान यांनी सोयलशी वाद घालण्यास सुरुवात केली.http://aapulkivivahsanstha.com

माझ्याकडे आलेले गिऱ्हाईक पळवितो, तुला आता मारूनच टाकतो, तुला जिवंत ठेवत नाही, अशी धमकी देत सोयलवर वार केले. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *