पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!!!                 “या” गावात चिडलेल्या पत्नीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत घातली पतीच्याच डोक्यात पहार

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!!! “या” गावात चिडलेल्या पत्नीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत घातली पतीच्याच डोक्यात पहार

पुणे

मलठण (ता. शिरुर) येथील माळवस्ती येथे पत्नीने घरगुती कारणाने वाद झाल्याने चिडून पतीच्या डोक्यात पहार मारून जखमी केल्याची घटना घडली आहे.

मलठण (ता. शिरूर) येथील माळवस्ती येथे अभिजित भोसले व तृप्ती भोसले हे दाम्पत्य राहत आहे.या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणातून वाद झाले. या कारणावरून तृप्ती हिने चिडून पती अभिजित यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच घरातील लोखंडी पहार त्याच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले.याबाबत अभिजित भिका भोसले (वय २८ वर्षे रा. माळवस्ती मलठण ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी तृप्ती अभिजित भोसले (वय २४ वर्षे रा.माळवस्ती, मलठण ता. शिरुर जि. पुणे) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अनिल आगलावे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *