पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !भावाला उसने दिलेले पैसे नवर्‍याने मागीतल्याचा बायकोला आला राग; नवरा झोपेत असतानाच बायको दबक्या पावलांनी आली अन् नवर्‍याच्या अंगावर ओतले उकळते पाणी

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !भावाला उसने दिलेले पैसे नवर्‍याने मागीतल्याचा बायकोला आला राग; नवरा झोपेत असतानाच बायको दबक्या पावलांनी आली अन् नवर्‍याच्या अंगावर ओतले उकळते पाणी

पुणे

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून  एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साखर झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर पत्नीने उकळते पाणी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत पती गंभीरित्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

थरकाप उडवणारी ही घटना शिवणे परिसरात गुरुवारी (ता. १३) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महादेव जाधव (वय ३०, रा. शिवणे) असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी संशयित महिलेविरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव जाधव यांनी पत्नीच्या भावाला काही रक्कम उधार दिली होती. पैशांची अडचण असल्याने त्यांनी मेहुण्याला पैसे परत करण्यास सांगितले. भावाला दिलेले उधार पैसे सतत मागत असल्यावरून पत्नीच्या मनात राग होता.

या रागाच्या भरात पत्नीने गुरूवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरात झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर गरम उकळलेले पाणी टाकले. या घटनेत महादेव गंभीरित्या भाजले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात पत्नीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *