पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !आपण पोलीस काय कोणाच्या बापाला घाबरत नाही असे म्हणत दहशत माजवली,त्याच रस्त्यावरून त्याची धुलाई करत पोलिसांनी धिंड काढली

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !आपण पोलीस काय कोणाच्या बापाला घाबरत नाही असे म्हणत दहशत माजवली,त्याच रस्त्यावरून त्याची धुलाई करत पोलिसांनी धिंड काढली

पुणे

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील हॉटेलमध्ये तोडफोड करत लूटमार केल्याची घटना रविवारी घडली होती. तोडफोड करुन दहशत माजवणारा आरोपी वैभव इक्कर याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या सराईत गुन्हेगाराची हवेली पोलीसांनी घटनास्थळी आणून चांगलीच धुलाई केली.

आपण पोलीस काय कोणाच्या बापाला घाबरत नाही, असं म्हणत आरोपी वैभव खडकवासला किरकटवाडी शीव रस्ता परिसरात दहशत माजवत होता. त्याच रस्त्यावरून त्याची धुलाई करत पोलिसांनी धिंड काढली.

या गुन्हेगाराच्या त्रासाने वैतागलेले परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलं. सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावच्या हद्दीत कोल्हेवाडी येथे गुंड वैभव इक्करने हॉटेलची तोडफोड करून कामगारांना मारहाण करत पैसे लुटले होते.

धक्कादायक म्हणजे याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी आलेले हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनाही आरोपीने मारहाण केली होतीवैभव इक्कर व त्याच्या एका साथीदाराने हॉटेलमध्ये तेथील कर्मचाऱ्यांसोबत आधी हुज्जत घालून दारुच्या बाटल्या फोडल्या.

काही वेळानंतर त्या सराईत गुन्हेगाराने हॉटेलमधील कामगारांना मारहाण करत फ्रीज, काचेचे दरवाजे, दारुच्या बाटल्या यांसह इतर वस्तूंची तोडफोड करत सुमारे एक ते दीड लाखाचे नुकसान करुन गल्ल्यातील २५ ते ३० हजार रुपये काढून घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *