पुणे
पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची गळा चिरून हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीये.
पती पत्नीच्या नात्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असात. यामध्ये एकमेकांवर असलेला विश्वास या नात्याला अधिक घट्ट करतो. विश्वास नसल्यास त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही.
अन् त्याचा दुर्दैवी शेवट होतो. पुण्यातील या घटनेत देखील नात्यात विश्वास नसल्यानं मोठा घात झाला आहे.पुण्यातील कोंढवा येथील पिसोळी भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीची हत्या केल्यावर पती तेथून पसार झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरती रणजीत झा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
तर याप्रकरणी पती रणजीत उर्फ विकास झा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती मूळचा बिहारचा रहिवासी आहे.
तो मोटारीवर चालक म्हणून काम करतो. तर आरती झा एका सराफी पेढेत कर्मचारी म्हणून काम करत होत्या.