पुणे जिल्हा हादरला!!!!                              कनिष्ठ शाखा अभियंत्याच्या मृत्यूने पंचायत समितीत शाेककळा;आत्महत्या की घातपात ?

पुणे जिल्हा हादरला!!!! कनिष्ठ शाखा अभियंत्याच्या मृत्यूने पंचायत समितीत शाेककळा;आत्महत्या की घातपात ?

खेड

खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ शाखा अभियंत्याचा संशयास्पद मृतदेह जंगल परिसरात आढळुन आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. बापुराव शिंदे असे मृत्यु झालेल्या शाखा अभियंताचे नाव आहे.खेड तालुक्यातील वाकळवाडी येथील पत्रशेड न उभारताच बील काढल्याची तक्रार झाली होती .

यावरुन खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील भष्ट्राचार समोर आला होता. यावरुन वाकळवाडी ग्रामस्थांसह माजी खासदार शिवाजी आढळराव पाटीलांनी खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात होत असलेल्या भष्ट्राचाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर शिंदे यांचा भिमाशंकर रोडवरील जंगल परिसरात संशयास्पद मृतदेह आढळून आलाय. त्यामुळे हि आत्महत्या आहे कि घातपात अशी चर्चा रंगली आहे. या प्रकरणी राजगुरुनगर पोलीसांकडुन तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *