पुणे-गराडे-सासवड मार्गावर “या” दिवसापासुन धावणार पी.एम.पी बसेस !!!! दत्ताञय फडतरे यांच्या मागणीची पी.एम.पीने घेतली दखल

पुणे-गराडे-सासवड मार्गावर “या” दिवसापासुन धावणार पी.एम.पी बसेस !!!! दत्ताञय फडतरे यांच्या मागणीची पी.एम.पीने घेतली दखल

पुणे

शहरातील काञज पी.एम.पी आगारातुन बोपदेव घाट -भिवरी -गराडे -कोडीत -सासवड हा नवीन पी.एम.पी बसमार्ग सुरु होणार आहे. हा बसमार्ग सुरु होण्यासाठी दत्ताञय फडतरे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे  मुख्य व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा , वाहतुक व्यवस्थापक यांकडे अनेक दिवसांपासुन पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या मागणीची पी.एम.पी कडुन दखल घेण्यात आली.पुढिल आठवड्यात या मार्गावर बसेस सुरु करण्याबाबत नियोजन सुरु असल्याचे  फडतरे यांना पी.एम.पी. प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे.

महापालिका हददीपासुन अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असणारे गराडे गाव व परिसरातील नागरिकांना पुणे व सासवड शहरात ये- जा करण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे मोठी लोकसंख्या असलेला भागातील  प्रवाशांची गैरसोय होत असल्याने पी.एम.पी बसेस सुरु करुन परिसरातील नागरिकांची अनेक वर्षोपासुन  प्रवासासाठी होत असलेली गैरसोय कायमची  दुर करण्याची मागणी दत्ताञय फडतरे यांनी  निवेदनादवारे पी.एम.पी प्रशासनाकडे केली होती . सातत्याने करत असलेल्या  पाठपुराव्यामुळे त्यांच्या मागणीची दखल घेतली आहे.

करोना निर्बंधामुळे एक- दिड वर्षोपासुन एस.टी सेवा अनियमित झाली होती. एस.टी विलीनीकरनासंदर्भात पुकारलेल्या बंद मुळे या भागात काही प्रमाणात सुरु असलेली एस.टी सेवा  कोलमडली असल्याने दैनंदिन  .शाळा ,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना  सवलतीच्या दरात प्रवास करता येत नव्हता. प्रवाशांना खासगी वाहनाने  जास्त पैसे देवुन प्रवास करावा लागत असल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाला आर्थिक  फटका सहन करावा लागत होता.महापालिका हददी पासुन जवळ असुन ही  पी.एम.पी बसेस ही  नाहीत व सासवड एस.टी आगारातुन एस.टी ही  नाही , या भागातील नागरिकांची  “ना घर का ना घाट  का” अशी परिस्थिती निर्माण झाली होती.येत्या काही दिवसात ग्रामस्थांना हक्काची आणि खाञीशीर पी.एम.पी सेवा उपलध्ब होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस मोरगाव ,जेजुरी ,दौंड ,कापुरव्होळ ,वीर ,निरा तसेच लोणावळ्यापर्यंत पोहचत आहेत.परंतु , महापालिका हददीपासुन अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरिल भागात कोणतीही सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे सर्वसामान्य गरिब कुटुबांतील विद्यार्थी-विद्यार्थ्यींनींनी शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. लवकरच शाळा -महाविद्यालयातील विद्यार्थीं विद्यार्थीनींना वेळेवर हक्काची सेवा उपलध्ब होणार आहे.

गराडे व वाडी -वस्त्यांवरिल नागरिक पी.एम.पी.दवारे सासवड शहर व पुणे शहरास जोडले जाणार असल्याने याभागातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा , दुध व्यावसायिक ,महिला वर्गाचा  ये-जा करण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

गराडे गाव वाडीवस्त्यांवरिल व कोडीत परिसरातील ग्रामस्थांना सासवड व पुणे शहरात ये -जा करण्यासाठी बसेस सुरु होण्यासाठी दत्ताञय फडतरे यांनी सातत्याने  पाठपुरावा केल्याने ह्या या भागातील प्रवासासाठी अनेक वर्षोपासुनचा प्रश्न कायमचा मिटला आहे. यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडुन फडतरे यांनी केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *