परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नका;नाही खाल्ल तर कोण मरत आहे का?,नका खाऊ टोमॅटो

परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नका;नाही खाल्ल तर कोण मरत आहे का?,नका खाऊ टोमॅटो

पुणे

राज्यात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ४०० ते ५५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. हे फक्त २० किलो वजनाच्या एका क्रेटचे दर आहेत. यावरच आता क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नका’, असं ते म्हणले आहेत.सदाभाऊ खोत म्हणाले आहेत की, ”ज्याला परवडत नसेल त्यांनी दोन, तीन महिने टोमॅटो खाऊ नका. टोमॅटो नाही खालं तर कोण मरत आहे का? नका खाऊ टोमॅटो.

ते म्हणले,टोमॅटोच्या महामारीमुळे सुद्धा रोज मरणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. यामुळे दवाखानेही भरलेले आहेत. सगळे डॉक्टरही चिठ्ठीवर टोमॅटो असं लिहून देत आहेत. कारण आता एकच औषध टोमॅटो आहे.

दरम्यान, या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे टोमॅटोची लागवड कमी आहे. दरवर्षी या काळात मोठी आवक व्हायची. यंदा आवक कमी असल्याने दर वाढलेले आहेत. बाजारात मागील आठ ते दहा दिवसांपासून टोमॅटोच्या दरात जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे.

किरकोळ बाजारात टोमॅटोचा दर ४० ते ५० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक आहे. तसेच उच्चतम प्रतिचा टोमॅटो प्रतिक्रेट ५५० रुपयांपर्यंत गुरुवारी विकल्या गेला. बाजारात सरासरी ४०० रुपयांपासून ५५० रुपयांपर्यंत टोमॅटोला दर मिळाले. येत्या काळात आवक वाढली तर दरांवर परिणामाची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *