निखिल जगताप यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार

निखिल जगताप यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार

पुरंदर

आम आदमी पार्टी पुरंदर- हवेली यांच्या वतीने जनसंवाद मेळावा व आदर्श सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा जयदीप मंगल कार्यालय सासवड येथे संपन्न झाला. यावेळी विविध स्तरातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दैनिक प्रभात चे पत्रकार निखिल सतिश जगताप यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जनसंवाद मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. कृषी, सामाजिक, वैद्यकीय, आदर्श सरपंच, आदर्श उद्योजक, वकील, डॉक्टर, जलमित्र, प्राणीमित्र तसेच विविध ग्राम संघ महिला समूह आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी गौरवण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून कृषी क्षेत्रामध्ये लेखन करून आपला पत्रकारिता क्षेत्राचा ठसा जगताप यांनी उमटवला आहे. पत्रकारिताक्षेत्रातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच समाजामध्ये घडत असलेल्या घडामोडी यांना वाचा फोडण्यासाठी निखिल जगताप हे काम करत आहेत. या कार्याची दखल घेत आम आदमी पार्टी पुरंदर हवेली यांच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष धनराज वंजारी, आप पुणे विभागाचे अध्यक्ष मुकुंद कीर्दत, तसेच आपचे पुणे विभाग सचिव अक्षय शिंदे यांच्यासह आपचे पुरंदर हवेलीचे अध्यक्ष दत्तात्रय कड, सचिव स्वप्निल गायकवाड, उपाध्यक्ष संजय नाना जगताप, खजिनदार नितीन राऊत, संघटक अमोल कड, सहसंघटक स्वप्निल शेंडकर,यांच्यासह संदीप चौडकर, संदीप साबळे, शहाजी कोलते, राजेंद्र माने, गणेश चौधरी विजय धायगुडे, प्रवीण खेडेकर, सचिन पवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *