नारायण राणेंवरील कारवाईचा पोलिस अधिकाऱ्यास फटका बसण्याची शक्यता

नारायण राणेंवरील कारवाईचा पोलिस अधिकाऱ्यास फटका बसण्याची शक्यता

मुंबई

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील गुन्हा दाखल करून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची संपूर्ण देशभरात चर्चा झाली होती.त्यांना दबंग पोलिस अधिकारी अशी देखील उपमा मिळाली होती.पण ही दबंग कारवाई दीपक पांडे यांना भोवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.असे देखील म्हटले जाते,दीपक पांडे यांची संजय राऊत यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत.त्यामुळे वरुन दीपक यांची बदली व्हावी यासाठी दबाव वाढवला जात आहे.

दीपक पांडे हे 1999 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.2020 मध्ये त्यांनी नाशिक पोलिस आयुक्तालयांचा कारभार हाती घेतला होता.तेव्हा पासून ते नेहमीच चर्चेत आहेत.पोलिसांसाठी कोविड सेंटर,पोलिस आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य,कोरोना काळात ग्रीन ज्यूसचे धडे देत पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही ग्रीन ज्यूस पिण्यास भाग पाडले. अट्टल गुन्हेगारांवर देखील पांडे यांनी कारवाई केली आहे.त्यामुळे ते एक दबंग अधिकारी म्हणून ओळखले जातात.

कोणाचीही भीडभाड न ठेवता दबंगगिरी सुरूच ठेवली, तोच प्रत्यय नारायण राणे यांच्यांवर गुन्हा दाखल करताना दिसला. राज्यात कुठे नाही पण नाशकात थेट केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला.पांडे यांची आणखी 12 वर्षांची कारकीर्द बाकी आहे, पण सेनेमुळे पांडेजी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नारायण राणे यांना अटक करणे पांडे यांना महागात पडू शकते.संजय राऊत हे देखील पांडे यांचे अगदी खुल्या मनाने कौतुक करत असतात.त्यामुळे आता दीपक पांडे यांची बदली होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *