नायगावमध्ये येथे रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद

नायगावमध्ये येथे रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद

नायगाव ( प्रतिनिधी ) :-
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष प्रकाशनाना कड यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव ( ता पुरंदर ) येथील श्री सिद्धेश्वर गणेशोत्सव ( तालमीचा राजा) मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरास युवक आणि नायगाव ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. ७६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.


राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कड, नायगावचे सरपंच बाळासाहेब कड, माजी सरपंच दत्तात्रय कड, माजी उपसरपंच अनिल शेंडगे, हभप शांताराम कड, ग्रामपंचायत सदस्य सुभाष चौंडकर आदींच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन झाले. हडपसर येथील अक्षय ब्लड बँकेच्या टिमने कामकाज पाहिले.

याप्रसंगी रमेश कड, दिलीप मोरे, बाळासाहेब शेंडगे, रोहिदास कड, अशोक होले, नाना कड, अरूण कड, स्वप्नील पाटोळे यांसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळाचे प्रा दत्तात्रय कड, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सागर होले, सुरज कड, अजिंक्य कड, भरत कड, जिल्हा बँकेचे अधिकारी विकास कड, सागर खेसे, हनुमंत कड, गणेश कड, संतोष कड, तुषार गोरावडे, संग्राम खेसे, महेश कड, अमोल मेमाणे आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन केले. रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *