धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधुन भगवान गौतम बुद्धांच्या मुर्तिची प्रतिष्ठापना

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधुन भगवान गौतम बुद्धांच्या मुर्तिची प्रतिष्ठापना

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या टेकवडी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभ मुहूर्तावर तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

भगवान गौतम बुद्धांची मुर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्राची पुर्ण टेकवडी गावातुन बैलगाडीतुन मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत पुर्ण गाव सहभागी झाले होते.

या कार्यक्रमास नवनाथ इंदलकर,सुरज गदादे (उप सरपंच),खंडागळे साहेब (ग्रामसेवक),तसेच सम्राट अशोक तरुण मंडळाचे एड रमाकांत कांबळे,प्रकाश कांबळे,संजीवकुमार कांबळे, शैलेश गजरमल,प्रवीण कांबळे,राकेश कांबळे, कोंडीबा कांबळे,श्रीकांत कांबळे,उत्कर्ष गजरमल, निखिल गजरमल आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *