धक्कादायक !!!!! सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, घरकुल मिळत नसल्याने महिलेचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; जिल्‍हाधिकारी कार्यालयातील प्रकार

धक्कादायक !!!!! सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, घरकुल मिळत नसल्याने महिलेचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; जिल्‍हाधिकारी कार्यालयातील प्रकार

यवतमाळ

यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात वाई येथील महिलेचा आत्मदाहनाचा प्रयत्न केला. घरकुल मिळत नसल्याने महिलेचा संताप अनावर झाल्‍याने सदर प्रकार केला. शहर पोलिसाच्या सतर्कमुळे अनर्थ टळला आहे.

घरकुल मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून ही दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या महिलेने यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदाहनाचा प्रयत्न केला. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या सातर्कतेने आत्मदाहनाचा प्रयत्न फसला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शांता बनसोड असे महिलेचे नाव असून महिला यवतमाळ तालुक्यातील वाई येथील रहिवासी आहे.

घरकुल मिळावे यासाठी महिला ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी तिच्यासोबत पेट्रोल होते.

महिला आत्मदहन करणार असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात येताच ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *