धक्कादायक !!!!! शिवरायांच्या पुतळ्याच्या लाईटसाठी मला कपडे विकावे लागतील; “या” आमदारांचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक !!!!! शिवरायांच्या पुतळ्याच्या लाईटसाठी मला कपडे विकावे लागतील; “या” आमदारांचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल

पुणे

राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत भाजप नेत्यांकडून अनेक वादग्रस्त वक्तव्ये करण्यात येत आहेत. राज्यपाल कोश्यारी, प्रसाद लाड यांच्यानंतर भाजपच्या आणखी एका आमदाराचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यात भाजप आमदार शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे.भाजपचे भोकरदन विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांचे चिरंजीव असलेले संतोष रावसाहेब दानवे यांचा एक जूना व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात आमदार संतोष दानवे एका शिवप्रेमीला हटकताना दिसत आहे.

“पुतळ्याला एलईडी लावायला जर मी पैसे दिले तर, मला माझे कपडे विकायला लागतील” असं वादग्रस्त विधान भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ जूना असून आता पुन्हा व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *