धक्कादायक !!!!!    “या” व्यक्तिने आधी सरण रचले,पूजा केली नंतर स्वतःला जाळून घेतले.

धक्कादायक !!!!! “या” व्यक्तिने आधी सरण रचले,पूजा केली नंतर स्वतःला जाळून घेतले.

नागपूर

जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील किन्ही येथील एका वृध्द शेतकऱ्याने आपल्याच शेतात स्वत: सरण रचले. पूजा करून त्याठिकाणी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. आत्माराम मोतीराम ठवकर असं ८० वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते वारकरी असून, धार्मिक प्रवृतीचे होते. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी रचलेल्या सरणाशेजारी त्यांनी विधीवत पूजाही केली. येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे ते वडीत आहेत.

शेतात असलेल्या गॅस गोडाऊनच्या शेजारी त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, घरात सर्व सुख सोई असताना असा अघोरी विचार मनात का डोकावला, स्वत: सरण रचून आत्महत्या करण्याचे कारण काय ? यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

शनिवारी किन्ही येथे रात्री मंडईचे आयोजन करण्यात आले होते. आत्माराम ठवकर हे येथे झाडीपट्टी नाटक बघायला गेले होते. नाटक पाहून झाल्यावर ते पहाटे त्यांच्या शेतात आले. येथे त्यांनी शेतातील लाकडे गोळा केली. स्वतःसाठी लाकडांचे सरण रचले. त्यावर तणस टाकली. सरणाची पूजा केली. त्यानंतर ते सरणावर चढले. स्वत:ला त्यांनी जाळून घेतले.

सकाळी आत्माराम यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर करीत आहेत. आत्माराम हे धार्मिक वृत्तीचे होते. वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते.

वृद्धापकाळामुळे ते सतत आजारीही राहायचे. त्यांना कोणताही दुर्धर आजार नव्हता किंवा ते गंभीर आजारी पडले नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती देखील चांगली होती. त्यांचे सर्व व्यवहार हे मुलगा बघत असतो. त्यांतरही त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला, याचा पोलीस शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *