धक्कादायक प्रकार!!!!शिवजयंती साजरी करण्यासाठी “या” गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी केली जयंती समितीकडे केली बाँडची मागणी

धक्कादायक प्रकार!!!!शिवजयंती साजरी करण्यासाठी “या” गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी केली जयंती समितीकडे केली बाँडची मागणी

पुणे

महाराष्ट्राचे आराध्यदैवत समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह सध्या राज्यासह देश-विदेशातही दिसून येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तर, दुसरीकडे शिवजयंती साजरी करण्यासाठी बाँड पेपरवर हमी लिहून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील एका गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांनी या बाँडची मागणी केली आहे.शिवजयंतीचा उत्साह सगळीकडे दिसून येत आहे. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, बीड जिल्ह्यात धक्कादायक मागणी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल, तर बॉण्ड वर लिहून द्या अशी मागणी पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावच्या सरपंच डॉ. रेशमा पोळ, ग्रामसेवक परमेश्वर सावंत यांनी जयंती समितीकडे केली आहे.

या प्रकाराने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.जयंती समितीने ग्रामपंचायतकडे रितसर लेखी अर्ज करून परवानगी मागितली आहे. असे असतानाही बॉण्ड की सक्ती का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष पोलीस प्रशासनाच्या परवानगीसाठी लेखी अर्ज केला आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळेल तुम्ही परवानगी द्या अशी मागणी समितीने केली होती. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अगोदर बॉण्डवर लिहून आणा त्यानंतर परवानगी देते असे डॉ. रेशमा पोळ सरपंच काही झालं तर याला उत्सव समिती जबाबदार असेल. अशी भूमिका घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जयंती साजरी करायची असेल तर बाँडची सक्ती का असा प्रश्न उपस्थित केला जात असून शिवप्रेमी मधून संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. यावेळी गावातील शिवप्रेमी सरपंचाचे बंधू यांनीही जाब विचारत बाँडवर परवानगी मागणं हे काय पाकिस्तान आहे का असा सवाल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *