धक्कादायक !!!!!   पुरंदर हवेलीच्या सीमेवरील “या” घाटात वारकर्‍यांच्या ट्रकचा ब्रेक झाल्याने भीषण अपघात

धक्कादायक !!!!! पुरंदर हवेलीच्या सीमेवरील “या” घाटात वारकर्‍यांच्या ट्रकचा ब्रेक झाल्याने भीषण अपघात

पुरंदर

पुरंदर व  हवेली तालुक्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या शिंदवणे घाटात शिंदवणे तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील  वारकऱ्यांना घेऊन चाललेल्या ट्रकला अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे . ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने ट्रक घाटात वळणावर कठड्याला नेला मात्र ट्रक वळणवरील एका ठिकाणी लटकत्या अवस्थेत थांबला यावेळी ट्रकच्या टपवर बसलेले वारकरी 25 फुट खाली डांबरी रोडवर आपटल्याने गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे .सदर घटना सोमवारी दिनांक 20 जून  रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  

याबाबत मिळालेल्या अधिक  माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी  येथील ग्रामस्थ पंढरपूरला आषाढी वारीसाठी ट्रक  मधून आळंदीला निघाले होते हा ट्रक जेजुरी मार्गे शिंदवणे घाटातून चालला होता पहिले वळण  घेतल्यानंतर दुसऱ्या वळणावर  चालकाला ट्रकचे  ब्रेक निकामी झाल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर चालकाने हा ट्रक सर्वात मोठ्या व इतर पर्यायी जागेवर वळण्याचा प्रयत्न केला पण ट्रक  नियंत्रणात न आल्याने तसेच पुढे सरकत जाऊन पुढे असलेल्या वळणवरील 25 फूट कड्यावर ट्रक लटकला आणि केबिनच्या टपावर बसलेल्या नऊ वारकरी रस्त्यावर आपटले  गेले या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 

या घटनेची माहिती मिळताच शिंदवणे  ग्रामस्थांनी  घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले तसेच कस्तुरी प्रतिष्ठान व अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन च्या रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने ऊरळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. 

या अपघातात जखमी झालेल्या वारकर्‍यांची नावे अनिल सोमनाथ ढेरे (वय 50), भागवत निवृत्ती शिंगारे (वय 60), महेश भगवान( वय 65 ), यशवंत भोसले (वय 70 ), स्वामीनाथ गोरख पवार (वय 65), संतोष गुलाब जगदाळे (वय 42), जयश्री पवार, सवित्रीबाई गायकवाड, सुभाष कुट्टी, सर्व राहणार साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा अशी या अपघातात जखमींची नावे आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *