धक्कादायक!!!!!! पुरंदर तालुक्यात डोळ्यात मिरची पुड टाकुन डोक्यात कोयत्याने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न

धक्कादायक!!!!!! पुरंदर तालुक्यात डोळ्यात मिरची पुड टाकुन डोक्यात कोयत्याने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न

पुरंदर

सासवड शहरातील एका धक्कादायक प्रकाराने संपूर्ण सासवड शहरात खळबळ उडाली आहे . सासवड शहरात  तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून डोक्यात कोयता मारून  जीवे  मारण्याचा प्रयत्न  केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याबतीत विशाल संजय पवार वय 29 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार इंदिरानगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे  यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . 
 सासवड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी फिर्यादी विशाल संजय पवार वय 29 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार इंदिरानगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांना आरोपी  सागर बाळासाहेब जगताप राहणार सोन्या मारुती चौक सासवड व सचिन उर्फ बाली अंकुश बोडरे राहणार सिद्धेश्वर सोसायटी सासवड यांनी फिर्यादी यांना त्यांचे मोटर सायकल नंबर एम एच 12- 1047 यावर बसून फिरायला जायचे आहे असे म्हणून महादेव मंदिरा जवळ नेले सागर जगताप यांचे बरोबर झालेल्या मागील भांडणाचे कारणावरून प्रथम योगेश कोंडे याने त्याचे जवळील मिरचीची पूड फिर्यादी यांचे डोळ्यात टाकून आरोपी सागर जगताप  याने फिर्यादी यांना डोक्यात कोयता मारून गंभीर दुखापत केली.

आरोपी याने सचिन उर्फ बाली अंकुश बोडरे हातातील दांडक्याने हातावर व पाठीवर मारहाण केली योगेश कोंडे पूर्ण नाव माहीत नाही राहणार खेड शिवापुर तालुका भोर जिल्हा पुणे याने शिवीगाळ दमदाटी केली म्हणून फिर्यादी यांची आरोपिं  यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे आहे. 

सदर गुन्ह्या प्रकरणी सागर बाळासाहेब जगताप,सचिन उर्फ बाली अंकुश बोडरे दोन्ही राहणार सासवड ता.पुरंदर, जि.पुणे,योगेश कोंडे पूर्ण नाव माहीत नाही राहणार खेड शिवापुर तालुका भोर जिल्हा पुणे या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून सासवड चे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पोलीस हवालदार संदीप चांदगुडे हे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *