धक्कादायक !!!!!   पुरंदर तालुक्यातील “या” नदीपात्रात एक जण बुडाला

धक्कादायक !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” नदीपात्रात एक जण बुडाला

पुरंदर

सासवड शहरातील संगमेश्वर मदिरासमोरील नदीपात्रात एक जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली असून सदर व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही .

याबाबतीत सासवड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार सासवड शहरातील क-हा  व चरणावती नदीच्या संगमावरील महादेवाचे प्रसिद्ध मदिर  असलेल्या संगमेश्वर मंदिरा समोरील नदीवरील बंधाऱ्यात एक व्यक्ति नदी किनारी कपडे धूत असताना तोल गेल्याने नदीत पडून पाण्यात बुडाली असून सदर व्यक्ति ही भंडारा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे .

ही व्यक्ति फिरस्ती म्हणजेच भटकी असून सदर व्यक्ति पाण्यात बुडाल्याची खबर मिळताच सासवड पोलिस या ठिकाणी दाखल झाले व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने या व्यक्तीचा पाण्यात शोध घेलता परंतु पाणी अधिक खोल असल्याने सदर व्यक्तीचा शोध अद्याप लागलेला नाही . 

या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे . एनडीआरएफ पथक दाखल झाल्यावर सदर व्यक्तीचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती मिळते आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *