धक्कादायक !!!!!   पुणे स्टेशनवरुन मांजरीला जाण्यासाठी रिक्षा पकडली,पण चालकाने प्रवाशाला पुरंदर तालुक्यातील “या” ठिकाणी नेऊन लुटले

धक्कादायक !!!!! पुणे स्टेशनवरुन मांजरीला जाण्यासाठी रिक्षा पकडली,पण चालकाने प्रवाशाला पुरंदर तालुक्यातील “या” ठिकाणी नेऊन लुटले

पुणे

पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. चोरी, लुटमारी, दरोडा, हत्या, अत्याचार या सारख्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशामध्ये पुण्यात बाहेरगावावरुन पुण्यात आलेल्या एका प्रवाशाला रिक्षाचालकाने मित्रांच्या मदतीने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरजवळील मांजरी येथे राहणारे भीमराव बिरादार (३५ वर्षे) यांना रिक्षा चालकाने लुटले. भीमराव हे काही कामानिमित्त बाहेरगावी केले होते.

काम पूर्ण झाल्यानंतर १४ जुलै रोजी रात्री ते पुन्हा पुण्यात आले. त्यांनी पुणे स्टेशन परिसरातून रिक्षा पकडली. मांजरीला जाण्यासाठी निघालेल्या भीमराव यांना रिक्षा चालकाने थेट सासवडला नेले. यावेळी रिक्षाचालकासोबत त्याचा साथीदार देखील होता.

भीमराव यांनी रिक्षाचालकाला सासवडला का नेत आहात? अशी विचारणा केली. तर रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने भीमराव यांना धमकावून त्यांच्याजवळ असलेला लॅपटॉप आणि सोन्याची अंगठी हिसकावून घेतली.

त्यानंतर त्यांनी भीमराव यांना सासवड परिसरात सोडून दिले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी भीमराव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी भीमराव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे पुण्यात येणाऱ्या प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे करत आहेत. बंडगार्डन पोलीस आरोपी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *