धक्कादायक!    पारगाव येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला पती-पत्नीचा मृतदेह

धक्कादायक! पारगाव येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला पती-पत्नीचा मृतदेह

दौंड

तालुक्यातील पारगाव येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले असून यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. विकास जगताप आणि त्यांची पत्नी हे दोघे गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांच्या राहत्या घरी आढळून आले असून त्यांनी गळफास घेतला की अजून काही याबाबत गावात थोडं चर्चा सुरू आहेत.

यामागे गृह कलह असण्याची शक्यता वर्तवली जात असून जगताप दांपत्य कळपास घेतलेल्या अवस्थेत घरात आढळल्या नंतर पारगाव येथील नागरिकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केलेली होती. घटनेची माहिती मिळताच व्यवस्थेचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून शव विच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पारगाव येथे नुकतेच सात जणांचे सामूहिक हत्याकांड घडले होते यानंतर पुन्हा एकाचा मृतदेह आढळून आला होता यातून पारगावकर सावरत नाही तोच पुन्हा जगताप दांपत्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने पारगाव मध्ये भीतीदायक वातावरण तयार झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *