धक्कादायक !!!!!    पाच लाख रुपये द्यायचे नसतील तर घटस्फोट दे; “या” गावात हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ

धक्कादायक !!!!! पाच लाख रुपये द्यायचे नसतील तर घटस्फोट दे; “या” गावात हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ

लातुर

आजही अनेक गावांमध्ये हुंडा प्रथा सुरू आहे. लग्न झाल्यावर देखील अनेक मुलींकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जाते. आता देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहीतेला माहेरहून ५ लाख रुपये आण नाहीतर घटस्फोट देईल अशी धमकी देण्यात आली आहे.

या घटनेत ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील अनुसया राहुल देवर्षे (बोडके) यांचा कर्नाटकातील खेरडा येथील राहुल सुदाम देवर्षे यांच्यासोबत २४ मे २०१० रोजी यांचा विवाह झाला. विवाहात त्यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना ५ लाख रुपये, दोन तोळे सोने आणि लग्नाचा सर्व खर्च करून दिला होता.

लग्नाला एक महीना होत नाही तोच, सासरच्या मंडळींची वागणूक बदलली. त्यांनी अनुसया यांना त्रास द्यायला सुरुवात केली. तु खूप काळी आहेस, तुझ्या वडलांनी कमी हुंडा दिला. दुसरी असती तर जास्त हुंडा मिळाला असता असे तिला बोलू लागले.सुरू असलेला त्रास त्यांनी माहेरी सांगितला. त्यानंतर त्यांच्या वडीलांनी गावातील काही माणसांसह मध्यस्ती करून सांगितले होते की, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही.

शक्य होतं तितकं मी केलं आहे. काही दिवसांनी महिलेला पुन्हा सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरूवात केली. यावेळी ५ लाख द्यायचे नसतील तर घटस्फोट दे असे त्यांना सांगितले. तसेच तिला मारहाण करण्यात आली.त्यामुळे महिलेने लातुरमधील महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली गेली.

त्यांनी वाढवणा पोलिस ठाण्यास पत्र पाठवून सदर घटनेची दखल घेण्यास सांगितले. यावर पीडितेच्या तक्रारीवरून पती राहुल सुदाम देवर्षे , दीर योगेश, नणंद, सासू विमलबाई यांच्यासह आणखीन दोघांविरुध्द वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *