धक्कादायक!!!!!शेतकऱ्यांनी सांगा जगायचं कसं ? साडेतीन टन कांदा घालून शेतकऱ्यांनाच भरावे लागले १ हजार ८३२ रुपये

धक्कादायक!!!!!शेतकऱ्यांनी सांगा जगायचं कसं ? साडेतीन टन कांदा घालून शेतकऱ्यांनाच भरावे लागले १ हजार ८३२ रुपये

पुणे

कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. साडेतीन टन कांदा विक्री करून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट अडत व्यापाऱ्याला 1 हजार 832 रुयये देण्याची वेळ बीड मधील एका शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे 70 हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयाही पदरात न पडल्याने जीवापाड जपलेल्या कांद्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय. त्यामुळं आम्ही जगावं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

बीडच्या जैताळवाडी गावातील हे आहेत शेतकरी भगवान डांबे.. दोन एकर शेतात त्यांनी कांद्याची लागवड केली होती. महागाचे बियाणे लागवडीचा खर्च खुरपणी फवारणी खते, आणि काढणीचा खर्च सगळं मिळून 70 हजार खर्च आला.. कांदा देखील चांगला निघाल्याने चांगले उत्पन्न मिळेल असे स्वप्न भगवान यांनी पाहिले होते.. कांद्याचा 120 गोण्या भरून सोलापूर मार्केट पाठवला.चांगला भाव मिळेल त्यातून मुलांचे शिक्षण लग्न घर कुटुंब चालवता येईल,असे स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिले होते.. मात्र कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात पडलेल्या पट्टी पाहून धक्काच बसला.. कारण अडत व्यापाऱ्याने आणखी 1 हजार 832 रूपये जमा करा म्हणून सांगितलं.

गावाकडून पैसे मागवून घेतले. सगळे पैसे देऊन रिकाम्या हाताने शेतकरी घरी आला. त्यावेळी त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून आणि कुटुंब रात्रभर रडलं.. आता कुटुंबाला जगवायचं कसं ? असा प्रश्न शेतकरी कुटुंबासमोर आहे. अशी परिस्थिती बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.कांदा उत्पादन करताना तळहाताच्या फोडप्रमाणे पीक जपलं. मात्र एक दिड लाख उत्पन्न होईल, असं वाटलं होतं. शेवटी पदरात काहीच पडलं नाही. अशी प्रतिक्रिया पीडित शेतकऱ्यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *