दुर्दैवी!!!!!                                                    पुरंदर तालुक्यातील “या” गावात नातवाला शाळेतून घरी आणताना झाला भयानक अपघात ; अपघातामध्ये आजोबा व नातवाचा मृत्यू

दुर्दैवी!!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात नातवाला शाळेतून घरी आणताना झाला भयानक अपघात ; अपघातामध्ये आजोबा व नातवाचा मृत्यू

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील दिवे या गावातील आजोबा व नातवाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 04/01/2023 रोजी दुपारी 02.00 वा.चे सुमारास मौजे दिवे गावचे हद्दीत हॉटेल शौर्यवाडा समोरील हडपसर-सासवड रोडवर माझे चुलते चालवत असलेल्या मोटार सायकल क्रमांक एम.एच.12 सी.पी. 1429 ला यमाहा मोटार सायकल क्र. एम.एच. 12 यु.एक्स. 6055 वरील चालक यशोवर्धन रामचंद्र मगदुम वय 18 वर्षे,धंदा-शिक्षण,रा.सिध्दीविनायक कॉलनी,गंगानगर,हडपसर,पुणे याने बेदरकार व निष्काळजीपणे त्याची मोटारसायकल चालवून माझे चुलते गोकुळ कोंडीबा झेंडे वय 65 वर्षे, व त्यांचा नातू पद्मनाथ निलेश झेंडे वय 10 वर्षे, यांना पाठिमागून वेगाने जोरात धडक दिली. दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत करून त्यांचे मृत्यूस व स्वतःचे तसेच पाठिमागील बसलेल्या आर्यन चिंचकर याचे दुखापतीस आणि मोटारसायकलचे नूकसाणीस कारणीभूत झाले म्हणून त्याचे विरोधात फिर्याद दिली आहे.

पुढिल तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई झिंजुर्के करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *