दुर्देवी!                 कांदा काढणी सुरु असताना मजूरांना पाणी आणण्यासाठी जाताना विजेचा शाॅक लागून बाप लेकाचा मृत्यू

दुर्देवी! कांदा काढणी सुरु असताना मजूरांना पाणी आणण्यासाठी जाताना विजेचा शाॅक लागून बाप लेकाचा मृत्यू

नाशिक

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालूक्यातील खडकी येथे विजेच्या धक्क्याने बाप लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे कळमकर कुटुंबावर शाेककळा पसरली आहे.शेतातील कांदा काढणी सुरु असताना मजूरांना पाणी आणण्यासाठी जाताना समाधान कळमकर यांना शेतातील सर्व्हिस वायर पडलेली दिसली.

ती बाजूला करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला.मुलाला विजेचा धक्का लागल्याचे दिसताच त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडिल पंढरीनाथ कळमकर हे गेले असता त्यांना ही विजेचा धक्का बसला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. वादळी वा-यामुळे व पावसामुळे सर्व्हिस वायरमध्ये करंट उतरला होता. पण हे लक्षात न आल्याने त्यातून ही दुर्घना घडलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *