दिवाळी सणानिमित्त “या” ग्रामपंचायतीची अनोखी योजना ; घरपट्टी भरा आणि किराणा माल घेऊन जा

दिवाळी सणानिमित्त “या” ग्रामपंचायतीची अनोखी योजना ; घरपट्टी भरा आणि किराणा माल घेऊन जा

जळगाव

शिरसोली वावडदा (ता . जळगाव) येथील ग्रुप ग्रामपंचायतीत सरपंचांनी घरपट्टी भरा आणि पाचशे रुपयांचा किराणा घेऊन जा अशी नवीन योजना आणली आहे. दिवाळी सणात योजना सुरु झाल्याने ग्रामस्थ घरपट्टी भरण्यासाठी गर्दी करु लागले आहेत.पाचोरा रस्त्यावर वावडा आणि बिलखेडा या दोन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्यात गेल्या काही काळापासून घरपट्टीची मोठी थकबाकी होती.

ग्रामपंचायतीची पाणीपट्टी आणि इतर करवसुली व्हावी यासाठी सरपंच राजेश वाडेकर यांनी ही योजना सुरू केली आहे.त्यात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना दोन लिटर तेल, साखर, मैदा यासह इतर पाचशे रुपयांच्या वस्तू दिल्या जात आहेत . दिवाळीपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. ह्या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

नागरिकांना सवलतीसह बक्षीसं मिळत असल्याने ग्रामपंचायत वसुली मोठ्या प्रमाणात होत आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी अनेक ग्रामस्थ हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *