दारुविक्री न करण्यासाठी समजूत घालण्यास गेलेल्या “या” गावच्या “पोलीस पाटलांवर” दारुविक्रेत्याने केले चाकूचे वार

दारुविक्री न करण्यासाठी समजूत घालण्यास गेलेल्या “या” गावच्या “पोलीस पाटलांवर” दारुविक्रेत्याने केले चाकूचे वार

वर्धा

दारुविक्री न करण्यासाठी समजूत घालण्यास गेलेल्या पोलीस पाटलावर चाकूचे वार करुन दारुविक्रेत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना धामणगाव वाठोडा गावात घडली. याप्रकरणी रात्री उशिरा सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कमलाकर नेहारे (४७) असे जखमी पोलीस पाटलाचे नाव आहे.दारुविक्रेता अल्ताफ शेख हा धामणगाव वाठोडा या गावात दारुविक्री करतो.आज महिला मंडळाने त्याची दारु पकडल्याने पोलीस पाटील कमलाकर नेहारे, तंटामुक्त अध्यक्ष गजानन इमडवार, शांता मोहिते हे काही गावकऱ्यांसह दारुविक्रेता अल्ताफ यास दारु न विकण्याबाबत समजावयास त्याच्या घरी गेले होते.

समजूत घालत असतानाच अल्ताफ याने पोलीस पाटील कमलाकर नेहारे यांच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच सोबत असलेल्या गजानन इमडवार यांनाही चाकूने मारहाण करीत जखमी केले.

यावेळी गावकऱ्यांनी अल्ताफ याला पकडून चांगलाच चोप दिल्याने तो जखमी झाला.आरोपी अल्ताफ याला सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अल्ताफवर जीवे मारण्यचा प्रयत्न तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *