दलित महासंघाच्या वतीने विविध सामाजिक मागण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन

दलित महासंघाच्या वतीने विविध सामाजिक मागण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन

अकलूज

प्रतिनिधी:कल्पना जाधव

दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र साहित्य प्रकाशित करण्या करता शासनाच्यावतीने स्थापन करण्यात आलेली अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापनेपासून अडचणीत असून त्यासमितीची अद्याप एक बैठकही झाली नाही. व त्यांना ओळखपत्र सुद्धा दिले नाही अण्णाभाऊंची जिवंतपणी ही परवडझाली व सध्या मरणोत्तरही त्यांची परवड होताना दिसत आहे .

नवीन स्थापन झालेल्या समितीच्या माध्यमातून भविष्यातील नवीन पिढीला अण्णाभाऊंनी लिहिलेला इतिहास माहितीव्हावा म्हणून अण्णा भाऊंचे उर्वरित साहित्य खंड रुपाने प्रकाशित करून अण्णाभाऊ साठे प्रेमींना व महाराष्ट्रातील जनतेलाअभ्यासा साठी जयंतीदिनी उपलब्ध करून द्यावे या प्रमुख मागणीसह डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानेसन्मानित करावे, डॉ. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळांच्या नियुक्त कराव्यात आशाविविध सामाजिक मागण्यांसाठी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. यांना डॉ मच्छींद्र सकटे संस्थापक अध्यक्ष यांच्यामार्गदर्शना खाली  प्रांताधिकारी अकलूज यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.

त्या वेळी दलित महासंघ पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ खिलारे,तालुका अध्यक्ष धनाजी साठे ,पूर्व विभाग प्रमुखबच्चन साठे,युवा नेते बिभीषण पाटील,महादेव साठे उपस्थित होते.सदरचे निवेदन प्रांताच्या वतीने प्रशासन अधिकारीबनसोडे यांनी स्विकारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *