त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे;माझ्या भाषेत सांगायचं झालं तर अशा विकृतांचे सामानच काढून टाकलं पाहिजे,बड्या नेत्याच्या संतापाचा कडेलोट

त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे;माझ्या भाषेत सांगायचं झालं तर अशा विकृतांचे सामानच काढून टाकलं पाहिजे,बड्या नेत्याच्या संतापाचा कडेलोट

पुणे

काही नराधम आणि विकृत माणसं काही गोष्टी करतात. त्याला लाडकी बहीण योजनेशी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात. माझी विरोधकांना पण विनंती आहे. वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या. मी कोणत्याही घटनेचं समर्थन करणारा नाही. जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे. तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या. त्याची फिकीर आम्ही करणार नाही.

त्याला आम्ही कडक शासन करणार आहोत. आमचा शक्ती कायद्यासाठी प्रयत्न सुरु आहे, राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी गेलाय. अशा प्रकारची विकृत माणसं जेव्हा आमच्या आया-बहि‍णींवर हात टाकतात, त्यावेळी त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर अशा विकृतांचे सामानच काढून टाकलं पाहिजे”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

राज्यातील अत्याचाराच्या घटनांनंतर त्यांनी संताप व्यक्त केलाय. ते यवतमाळमध्ये बोलत होते. शहरी भाग, ग्रामीण भाग, विदर्भ, मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र , कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र कोठेच कायदा व सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये. यासाठी कडक कारवाई केले जातात, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *