तीन वर्षापासून कामाचा मोबदला नाही;अधिकाऱ्यांकडून होणा-या त्रासाला व गरीबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने “या” घाटात उडी घेत केली आत्महत्या

तीन वर्षापासून कामाचा मोबदला नाही;अधिकाऱ्यांकडून होणा-या त्रासाला व गरीबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने “या” घाटात उडी घेत केली आत्महत्या

पुणे

तीन वर्षापासून मोबदला नाही,अंगणवाडीतील बालकांना पदरमोड करीत पुरविलेला पोषण आहाराची खर्चित रक्कम मिळाली नाही. शिवाय अधिकाऱ्यांकडून होत असलेल्‍या त्रास व गरिबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने तोरणमाळच्या घाटात उडी घेत आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकार नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील घडला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील जुगणीचा हिरीचापडा या पाड्यावरील अंगणवाडी केंद्रात अलका वळवी ही महिला अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. तिला तीन वर्षांपासून कामाचा कुठलाही मोबदला मिळत नव्हता. पगाराविना राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी तिला मानसिक त्रास दिल्याच्या आरोप मयत अलका वळवीच्या पतीने केला आहे.

अशा वेगवेगळ्या माध्यमातून वर्षानुवर्षे होणारा त्रास आणि गरीबिला कंटाळून अंगणवाडी सेविका अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नंदूरबार जिल्ह्यात घडला आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत मिठात पुरुन ठेवलेला मृत्यूदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही.

याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयत महिलेचे पती अमिताभ वळवी यांनी केली आहे. मात्र म्हसावद पोलीस ठाण्यात आद्यपही गुन्हा दाखल झाला नसून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *