तरुणांनी बौद्ध धम्माकडे आले पाहिजे : सुनिल तात्या धिवार

तरुणांनी बौद्ध धम्माकडे आले पाहिजे : सुनिल तात्या धिवार

सासवड

पुरंदर तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन आनंदात साजरा करण्यात आला.यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्यहार अर्पण करून वंदना घेण्यात आली.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमी च्या दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोबर या दिवशी धम्मदीक्षा दिली.

आपणाला मानवतावादी ,विज्ञानवादी बौद्धधम्म दिला.माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला.समतावादी,मानवतावादी,विज्ञानवादी बौद्धधम्म च स्वीकारला पाहिजे.बौद्धधम्मातील त्रिशरण, पंचशील, अष्टांगमार्ग यांचा अंगीकार केला तर जीवनाचा अर्थ समजेल.त्यासाठी तरुणांना त्रिशरण ,पंचशील आलेच पाहिजे असे परखड मत बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार यांनी मांडले.

या वेळी भारतीय बौद्ध महासभेच्या नियोजनाखाली धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्धमहासभेचे पुरंदर तालुका अध्यक्ष दादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक सचिव कैलास धिवार,प्रबोधनकार संभाजी गायकवाड,भारतीय बौद्ध महासभेचे सचिव अनिल मसने ,कार्यलयीन सचिव राजेंद्र लोंढे,माजी अध्यक्ष बापू सोनावणे,जे.पी.गायकवाड,जावळे गुरुजी,विलास गायकवाड, डी.जी.गायकवाड,लक्ष्मण लोंढे,बहुजन हक्क परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष डुबल, तालुका युवक अध्यक्ष कृष्णा फुलावरे,शाखाध्यक्ष सिद्धार्थ यादव,तेजस गायकवाड, धीरज गायकवाड यासह पुरंदर तालुक्यातील अनेक उपासक ,उपासिका उपस्थित होते.बहुजन हक्क परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *