डॉक्टर डे चे औचित्य साधुन डॉक्टरांना केले सन्मानित

डॉक्टर डे चे औचित्य साधुन डॉक्टरांना केले सन्मानित

पुरंदर 

डॉक्टर डे चे औचित्य साधुन पुरंदर तालुक्यातील सर्व सरकारी व खाजगी डॉक्टरांचा सन्मान पुरंदर -हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कोरोनाशी दोन हात करुन  तालुक्यातील नागरिकांना जीवदान देण्याचे काम डॉक्टरांनी केले आहे 

आरोग्य केंद्र माळशिरस याठिकाणी हा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी पुरंदर तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव,माळशिरस गावचे माजी सरपंच एकनाथतात्या यादव,दिलीप मोरे,रफिक शेख,शांताराम यादव,बापु ढोरे,बाळकृष्ण गायकवाड व माळशिरस केंद्राचे आरोग्य अधिकारी विवेक आबनावे तसेच ग्रामस्थ उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *