टेकवडी पिसर्वे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

टेकवडी पिसर्वे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

माळशिरस प्रतिनिधी

कोट्यावधी रुपयांचा निधी मिळून देखील रस्त्याच्या कामात माती आणि मुरमाचा क्षमतेपेक्षा जास्त वापर झाल्याने टेकवडी पिसर्वे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप टेकवडी ग्रामस्थांनी केला आहे.

पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील कोट्यावधी रुपये खर्चतरुण ब्रह्मंड घाट टेकवडी पिसर्वे पिंपरी व पुढील काम सध्या सुरू आहे. या रस्त्यांपैकी सध्या सुरू असलेल्या टेकवडी पिसर्वे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. मुरूम ऐवजी मातीचा जास्त प्रमाणात वापर केला जात आहे. खडी सोबत मुरमाड दगडाचा वापर केला आहे.

रस्त्याच्या लगतच दोन्ही बाजूने खोदलेल्या चाऱ्यांची खोली कमी-अधिक प्रमाणात आहे. टेकवडी पासून सुरु झालेल्या रस्त्याच्या लगत एका ठिकाणी दहा फुटापेक्षा जास्त खोलीची चारी खोदलेली आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण दिल्याचे दिसून येत आहे.

टेकवडीच्या हद्दीमध्य यापूर्वी लावलेली झाडे रस्त्याच्या कामा वेळी काढून टाकण्यात आलेली आहेत यामुळे वृक्षलागवड करून आपल्या गावाची ऑक्सीजन व्हीलेज टेकवडी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गावाला ठेकेदाराने विचारात घेतले नसल्याचे दिसून येत आहे.

यामुळे रस्त्याचे काम चांगल्या स्वरूपाचे करावे इस्टिमेट नुसार रस्त्याचा दर्जा असावा अशी मागणी टेकवडी येथील ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस नेते ग्रा.पं.सदस्य बबनराव इंदलकर,मा.सरपंच खंडेराव इंदलकर,सा.का.नवनाथ झिंजूरके,उपसरपंच कु.सुरज गदादे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *