जर आमचा महापौर झाला तर “या” शहराचे नाव नथुराम गोडसे नगर केले जाईल

जर आमचा महापौर झाला तर “या” शहराचे नाव नथुराम गोडसे नगर केले जाईल

मुंबई

अखिल भारत हिंदू महासभा मेरठ महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासोबतच एक मोठी घोषणा देखील केली आहे. मेरठमध्ये जर हिंदू महासभेचा महापौर झाला तर मेरठचे नाव नथुराम गोडसे नगर असे केले जाईल, अशी घोषणा हिंदू महासभेनं केली. शिवाय हिंदू महासभेनं जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात देशाला हिंदू राष्ट्र बनवणे हे प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेवरही हिंदू महासभेनं जोरदार टीका केली. मुस्लिम मतांसाठी शिवसेना तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेनं केला.या वर्षाअखेर मेरठमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत.

या निवडणुकीत हिंदू महासभा नगरसेवक पदासाठी उमेदवार उतरवणार आहे आणि जर मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आले आणि महापौरपद मिळाले तर मेरठचे नाव बदलून नथुराम गोडसे नगर केले जाणार असल्याचा दावा हिंदू महासभेनं केला.यासोबतच शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मुस्लिम नावांना बदलून हिंदू महापुरुषांची नावे ठेवण्यात येणार आहेत.

पूर्वी भारतीय जनता पक्ष स्वतःला हिंदू पक्ष म्हणवत असे, पण आज इतर समाजातील लोकांचाही वरचष्मा आहे. त्याचप्रमाणे शिवसेनाही मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेचे उपाध्यक्ष पंडीत अशोक शर्मा यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *