चिन्हाच्या प्रसारासाठी भन्नाट कल्पना,चक्क चांदीची टोपी बनवली, बारामती मतदारसंघातील शरद पवारांच्या चाहत्याची सर्वत्र चर्चा

चिन्हाच्या प्रसारासाठी भन्नाट कल्पना,चक्क चांदीची टोपी बनवली, बारामती मतदारसंघातील शरद पवारांच्या चाहत्याची सर्वत्र चर्चा

पुणे

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ‘टोपीवाला चाहता’ बारामतीत चर्चेचा विषय बनला आहे. बारामतीतील एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याने चक्क चांदीची टोपी बनवली आहे. या टोपीवर पवार साहेब, ताईसाहेब असे लिहिले असून ज्येष्ठ नेते शरद पवारांना नव्याने मिळालेले तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बनवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश सरस्वती अशोक नवले असं या कार्यकर्त्याचे नाव आहे. बारामती शहरात घरगुती लॉन्ड्रीचे काम गणेश करतात. गणेश यांच्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मात्र त्यांच्या आजोबांपासून शरद पवारांना मानतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह गेल्याने गणेश यांचं कुटुंब ही नाराज झाले होते.

शरद पवार यांना पुन्हा नवीन नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर पक्ष आणि चिन्ह जनमानसात पोहोचविण्यासाठी गणेश यांनी चांदीची टोपी बनवून त्या टोपीवर तुतारी वाजवणारा माणूस पक्षचिन्ह कोरून त्यांच्या परीने पक्षाचा प्रचार केला आहे.गणेश लॉन्ड्रीचा व्यवसाय होम डिलिव्हरी करतात. ते घरून ग्राहकांपर्यंत कपडे पोच करताना किंवा ग्राहकांकडून इस्त्रीसाठी कपडे आणताना ही टोपी घालून ये जा करतात.

यावेळी त्यांना ठिकठिकाणी थांबवून नागरिक उत्सुकतेने टोपी बघतात आणि कौतुक करतात. माझं संपूर्ण कुटुंब पवार साहेबांना मानणारे आहे. मात्र आम्हाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. असे असले तरी मला अनेक राजकीय नेत्यांबरोबर फोटो काढण्याची आवड आहे. मात्र हे माझ्या कुटुंबीयांना पटत नाही.

कुटुंबीयातील लोक मला म्हणायचे की, आपण पवार साहेबांचे मतदार आहोत. त्यामुळे पवार साहेबांच्या विचाराने आपण चालायचे. त्यानुसार मी पवार साहेबांचे नवे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे, असं गणेश यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *