चंद्रकांत पाटील होणार गुजरातचे मुख्यमंत्री? मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ‘ही’ नावे चर्चेत

चंद्रकांत पाटील होणार गुजरातचे मुख्यमंत्री? मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ‘ही’ नावे चर्चेत

मुंबई

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या राजीनाम्याची विरोधकांनाच नव्हे तर पक्षातील नेत्यांना देखील सुद्धा कल्पना नव्हती असे सांगितले जात आहे.

राजीनामा दिल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रुपाणी म्हणाले, मी राजीखुशीनं राजीनामा दिला आहे, कुणाचाही माझ्या दबाव नाही. मला संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. तसेच माझ्या सहकाऱ्यांचे देखील आभार मानतो, पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी पार पाडणार आहे. जेपी नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी देखील अभूतपूर्व आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्य निवडणुका लढतो आणि 2022 च्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहे.गुजरातला आता नवं नेतृत्त्व मिळेल. नवीन नेतृत्त्वाला संधी देणं ही भाजपची परंपरा आहे. पदाचा राजीनामा देऊन संघटनेसाठी काम करण्याची इच्छा आहे, असं देखील रूपाणी या वेळी म्हणाले.

दरम्यान, रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे आता गुजरातचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावर चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. या नेत्यांमध्ये गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत उर्फ सी आर पाटील, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया, केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याही नावाचा समावेश आहे.

दरम्यान, पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू असून त्यांची संघटनेवर मजबूत पकड आहे. पाटील हे प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. विकास कामांना प्रमोट करण्याबाबत ते माहीर आहेत. गुजरात भाजपाने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी २८१ सदस्यांची जम्बो कार्यकारणी बनवली त्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे.

दरम्यान, पाटील यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत येण्यामागे एक कारण म्हणजे हे सर्व नेते पटेल समुदायातून येतात. गुजरातच्या राजकारणात पटेल समुदाय महत्त्वाची भूमिका निभावतो. यामुळे यापैकी देखील कुणालातरी संधी दिली जाईल अशी शक्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *