चंद्रकांत पाटील शक्तिमान माणूस, चंद्रकांत पाटलांची त्यांच्या जिल्ह्यात निवडून यायची क्षमता नाही : शरद पवार

चंद्रकांत पाटील शक्तिमान माणूस, चंद्रकांत पाटलांची त्यांच्या जिल्ह्यात निवडून यायची क्षमता नाही : शरद पवार

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार कलगीतुरा पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील हे शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीये. दुसरीकडे शरद पवार देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहे. आजही पुण्यात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा शरद पवार यांनी सत्कार केला. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याची खासदार शरद पवार यांच्यासोबत मोदीबागेत भेट झाली. त्यानंतर शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांचं कोथरूडमध्ये योगदान काय होतं? जो माणूस आपल्या जिल्ह्यात निवडून आला नाही, त्यांना काय बोलायचं. चंद्रकांत पाटील शक्तिमान माणूस, असा टोला शरद पवारांनी लगावला

शरद पवार पुढे म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील हे फार शक्तिमान गृहस्थ आहे. त्यांचे घर कोल्हापूरला आणि ते निवडणूक कोथरूडमधून लढले. त्यांना त्यांचं गाव सोडून कोथरूडमध्ये यावं लागलं. त्यांचं कोथरूड मध्ये काय योगदान? त्यांच्यावर काय भाष्य करावं?, असा जोरदार घणाघात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *