पुरंदर
मंगळवार 19/10/2021 रोजी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील गुळूंचे ता. पुरंदर, जिल्हा_ पुणे गावात रात्री 2 वाजता 8-9 जन चोरीच्या उद्देशाने कोयता,कुराड,काठी असे शस्त्र हातामध्ये घेऊन आले होते,गावातील श्री अक्षय पाटोळे यांना ते दिसता चोरांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून शांत राहायला सांगितले.
गावचे पोलीस पाटील श्री दीपक जाधव यांना ही माहिती कळवली आणि पोलीस पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600) सर्व गावाला व पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली. त्यामुळे तात्काळ गावकरी व जेजुरी पोलिस स्टेशनची नाईट राउंडची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आणि संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच,चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.