गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी हिंगणगाव पोलिस मदत केंद्राची होणार मदत

गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी हिंगणगाव पोलिस मदत केंद्राची होणार मदत

पुणे

कल्पना जाधव प्रतिनिधी

पुणे-सोलापूर महामार्गावर चोरी मारामारी करणारेव व वाळू उपसा, व अवैध धंदे करणाऱ्यावर जरब बसावी व इतर गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यासाठी तसेच महामार्गावर अपघात झाल्यावर तात्काळ मदत मिळावी यासाठी लोणी देवकर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर हिंगणगाव येथे उभारण्यात आलेल्या पोलिस मदत केंद्राच्या माध्यमातून जनतेला मदत मिळणार आहे.

लोणी देवकर मदत केंद्राच्या अंतर्गत 17 गावे व हिंगणगाव येथील मदत केंद्राच्या अंतर्गत 17 गावांना या मदत केंद्राचा उपयोग होणार आहे.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंदापूर पोलिस स्टेशन अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या लोणी देवकर पोलीस मदत केंद्र व हिंगणगाव पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाले .यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, व पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोणी देवकर पोलिस मदत केंद्राच्या अंतर्गत खालील गावे येतात लोणी देवकर ,काळेवाडी नंबर 1 ,माळवाडी ,पळसदेव, चांडगाव ,भावडी ,अगोती नंबर 1,2,3, गंगावळण ,कळाशी, कालठण नंबर एक, वरकुटे बुद्रुक, राजवडी ,लोणी देवकर, वनगळी ,गलांडवाडी नंबर1, घागरगाव,हिंगणगाव पोलिस मदत केंद्राच्या अंतर्गत येणारी गावे खालील प्रमाणे अवसरी, बेडसिंगे ,भाटनिमगाव, हिंगणगाव ,बाबुळगाव ,सरडेवाडी, कांदलगाव ,शहा ,महादेव नगर, पिम्प्री बुद्रुक ,सुगाव, पडस्थळ, चिंदादेवी ,आजोती ,शिरसोडी, गलांडवाडी नंबर 2 ,कालठण नंबर 2 ,अशी एकूण 17 गावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *