गाव विकणे आहे… पुणे जिल्ह्यातील “या” बत्तीस गावांमध्ये लागले गाव विक्रीच्या जाहिरातीचे बॅनर;नेमकं काय कारण…..

गाव विकणे आहे… पुणे जिल्ह्यातील “या” बत्तीस गावांमध्ये लागले गाव विक्रीच्या जाहिरातीचे बॅनर;नेमकं काय कारण…..

पुणे

पुण्यातील 32 गावांमध्ये लागलेले बॅनर सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. गाव विक्रीही ही बॅनरबाजी आहे. गाव विकणे आहे. अशा प्रकारच्या जाहिरातीचे बॅनर  पुण्यातील 32 गावांमध्ये लागले आहेत.  महापालिकेच्या आवाजवी कर धोरणात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. 

पुणे महापालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्याने आमचे गावच महापालिकेने विकत घ्यावे. यासाठी 32 गावांच्या माध्यमातून “गाव विकणे आहे” अशा प्रकारच्या जाहिराती गावोगावी लावण्यात येऊन पुणे महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 


महापालिकेने कोणत्याही सुविधा न पुरवता,टॅक्स मात्र भरमसाठ लावलेला आहे अशा पार्श्वभूमीवर “आम्ही टॅक्स भरू शकत नाही,तुम्ही आमचे गावच विकत घ्या.”अशी भूमिका ३२ गावातील ग्रामस्थांनी घेतलेली आहे. टॅक्स या विषयावर ३२ गावातील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यासाठी पुढील मोठ्या आंदोलनाची तयारी होताना दिसत आहे. सध्या धायरी, नऱ्हे, आंबेगाव किरकटवाडी, नांदोशी,खडकवासला नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे या गावात सर्वत्र बोर्ड लागल्याचे दिसत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *