औरंगाबाद
औरंगाबादच्या वैजापुर तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. वैजापुर तालुक्यातील नालेगावात तुरीच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती.
या तुरीच्या शेतातुन ३०३ गांजाची झाडे हस्तगत करण्यात आली असुन तब्बल ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आर्थिक फायद्यासाठी ही गांजाची लागवड करण्यात आली होती परंतु फायदा होण्याआधीच हा प्रकार उघडकीस आला असुन सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.